संट. फ्रान्सिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज), बोरीवली
महाराष्ट्र शासनाच्या वाचन संकल्पना उपक्रमांतर्गत आमच्या महाविद्यालयात विविध वाचनविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीच्या कालावधीत परीक्षा सुरू असल्याने परीक्षा संपल्यानंतर हे उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांचा आणि प्राध्यापकवर्गाचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
वाचन संकल्पना महाराष्ट्राच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढली आणि त्यांच्यातील वाचनाची गोडी आणि सवय अधिक मजबूत झाली.
विविध वाचनविषयक उपक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्तीला चालना दिली,
चर्चा आणि संवादाचे महत्त्व समजून घेतले.
यामुळे वाचन संस्कृतीला महत्त्व मिळाले आणि विद्यार्थ्यांना नवीन विषयांवर आधारित ज्ञान मिळविण्याची संधी प्राप्त झाली.
वाचन संकल्पना महाराष्ट्राच्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांना वाचनाच्या महत्वाची जाणीव करून दिली आणि त्यांना आपल्या ज्ञानवर्धनासाठी वाचनाची सवय लागली.