Skip to main content

Posts

Showing posts from February 1, 2026

वाचन संकल्प महाराष्ट्र २०२६

 महाराष्ट्र शासनाच्या वाचन संकल्प महाराष्ट्र उपक्रमांतर्गत सेंट फ्रान्सिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस), बोरीवली येथील Learning and Information Resource Centre (LIRC) मार्फत १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत विविध वाचनविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीचा विकास करणे, नियमित वाचनाची सवय निर्माण करणे तसेच बौद्धिक, सर्जनशील व संवाद कौशल्ये वृद्धिंगत करणे हा होता. विद्यार्थ्यांसह प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारीवर्गाचा या उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. राबवलेले उपक्रम वाचन संकल्पना महाराष्ट्र अंतर्गत खालील उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्यात आले: वाचन प्रतिज्ञा बुकमार्क मेकिंग / सर्जनशील कॉर्नर ऑनलाइन ग्रंथालय व वाचन प्रश्नमंजुषा एक पुस्तक • एक आठवडा वाचन आव्हान पुस्तक परीक्षण फलक / अभिप्राय बोर्ड संस्थांतर्गत विशेष व दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन मोठ्याने वाचन सत्र गट वाचन सत्र व ग्रंथालय स्वच्छता पुस्तकदान सत्र लेखक भेट          उपक्रमांचे परिणाम ...