Skip to main content

Posts

Showing posts with the label Marathi Bhasha Diwas 2022

पुस्तक परिचय: पर्स हरवलेली बाई - मंगला गोडबोले

 

पुस्तक परिचय: पानिपत - विश्वास पाटील

 

पुस्तक परिचय: बापलेकी / पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर, विद्या विद्वांस

 

पुस्तक परिचय: एक होता कार्व्हर / वीणा गवाणकर

  अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे, एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे. आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच पर्याय उरलेले आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणा-या आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर हताशपणे वाटचालकरायची किंवा परत मागे फिरून काव्हरने दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण या शाश्वत कॄषिसंस्कॄतीचा स्वीकार करायचा. भावी पिढयांच्या सुख-समॄद्धीचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच हवे असे पुस्तक. Held more than 30 years ago, Veena Gavankar’s biography of African-American scientist and agriculturist George Washington Carver, has remained one of the bestsellers in Marathi literature even today. A gripping story about a man and his determination to succeed amidst hardship and hurdles, the book not only captures the essence of perseverance, but also beautifully portrays how the desire and a thirst for knowledge indeed, does lead to greatness. Dubbed by the Times magazine in 1941 as the “Black Leonardo”, Carver’s contribution...

पुस्तक परिचय: सह-वास हा सुखाचा / मंगला गोडबोले

  ‘आयुष्य हा त्रास आहे!’ ‘आयुष्य हा वनवास आहे!’ ही तर नेहमीचीच वाक्यं झाली. पण आयुष्यात रूप-रस-गंधाची, व्यक्ती-प्रवृत्तींची खूप गंमत आहे हे जाणवायला असं एखादं पुस्तकच हातात यायला हवं. गेल्या काही वर्षांमध्ये विविध दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झालेल्या प्रसन्न ललितलेखांचा संग्रह. वाचल्यावर म्हणावंसं वाटेल, सहवास घ्यावा सुखाचा! मराठी राजभाषा दिन - २७ फेब्रुवारी

पुस्तक परिचय: अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड / नारायण मूर्ती

  नारायण मूर्ती यांनी अनेक अडथळे पार करून हे दाखवून दिलं आहे, की भारतात जागतिक दर्जाच्या, मूल्याधिष्ठित कंपनीची उभारणी करणं शक्य आहे. मूर्तींच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे नावीन्य आणि उद्योजकतेच्या जगात चमक आली आहे, आपली स्वत:कडे पाहण्याची आणि जगाची भारताकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. व्याख्यानांच्या या संचाद्वारे, व्यवसायामधील मूल्यं आणि नेतृत्वगुणाचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं आहे. - बिल गेट्स, अध्यक्ष, संचालक मंडळ, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन मराठी राजभाषा दिन - २७ फेब्रुवारी

पुस्तक परिचय: जावे त्यांच्या देशा / पु. ल. देशपांडे

माझ्या पायावर चक्र आहे की नाही ते मला ठाऊक नाही. पण मला येणारे प्रवासाचे योग पाहिल्यावर एखाद्या ज्योतिष्याला पाय दाखवावेसे वाटायला लागले आहे. एक गोष्ट मात्र खरी. मी मायदेशात तसा बैठा माणूस आहे. परदेशात मात्र खूप हिंडतो. अधाश्यासारखा पाहतो आणि ऐकतो. नव्हे, पाहण्यासाठी हिंडतो. कुठे काय ऐकण्यासारखे आहे ते शोधत जातो. आणि जे काही ऐकले-पाहिले ते सांगायची मला ओढ लागते. आणि त्यातूनच माझे हे सांगणे ऐकणारेही भेटत आले आहेत हे माझे भाग्य! ना वंशाचे, ना भाषेचे, ना धर्माचे, ना राष्ट्राचे असे कितीतरी लोक ह्या प्रवासात यथा काष्ठं च काष्ठं च म्हणतात तसे भेटतात. स्नेहाचा हात पुढे करतात. अकारण मने मोकळी करतात. आपल्या घराची दारे मोकळी करतात. कोण कुठला जर्मन आबिल, कुठली स्कॉटिश ब्रॉमलेबाई, हंगेरीतला गेझाकाका, पोन्नानेनी, डॉ. बेंके योशेफ आणि त्याची थेट पर्‍यांच्या राज्यातून उतरलेली छोटी एस्थेर... पुन्हा दिसणार देखील नाहीत... मन:पटलावर कायमची चित्रित झालेली पॅरिसमधल्या सीनच्या तीरावरची संध्याकाळ, कोण्या जपानी गेशाचा कानात वर्षानुवर्षे रेंगाळणारा तो ‘सायोनाऽऽरा’!...अनपेक्षितपणाने दिसलेला तो रोदांचा ‘थिंकर’......